Oil Price: कच्चं तेल स्वस्त पण पेट्रोल डिझेलचे दर का महाग? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले स्पष्टिकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oil Price rising reason given by hardeep puri

Oil Price: कच्चं तेल स्वस्त पण पेट्रोल डिझेलचे दर का महाग? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले स्पष्टिकरण

देशात काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंह पुरी यांनी वाढत्या दरावर वक्तव्य केलंय. 'कच्च्या तेलाच्या दरांत मोठी घट झाली असली तरी भारतीय ऑईल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कपात करणार नाहीत.' असे हरदिप सिंग पुरी म्हणालेत.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंह पुरी यांना माध्यमांद्वारे एक प्रश्न विचारण्यात आला होता. मागल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरांत घट होऊ शकते काय? त्याचं उत्तर देत हरदीप पुरी यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलंय.

विकसित देशांमध्येही ४० टक्क्यांनी वाढ: हरदीप पुरी

हरदीप सिंग पुरी म्हणाले, की विकसित देशांत २१ जुलै ते २२ ऑगस्ट पर्यंत इंधनांच्या किंमतीत ४० टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. मात्र भारतीय दरांमध्ये २.१२ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र कंपन्या त्यांच्या नुकसानभरपाईसाठी दर वाढवणे सुरूच ठेवणार आहे.

हेही वाचा: Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, चेक करा तुमच्या शहरातील भाव

मागल्या दोन वर्षांमध्ये आयात बेंचमार्कमध्ये जवळपास ३०३ टक्क्यांनी वाढ झाली. तर भारतात घरघुती एलपीजी सिलेंडरच्या दरांत २८ टक्के घट बघायला मिळाली. असंही यावेळी हरदीप पुरी म्हणाले.

जुलै महिन्यात २१ जुलै ते २२ ऑगस्ट दरम्यान प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यापारिक केद्रांमध्ये गॅसच्या किंमतीमध्ये वाढ नोंदवल्या गेलीय. तर यूएसएच्या हेनरी हबमध्ये १४० टक्के वाढ नोंदवल्या गेली. तर ब्रिटनमध्ये २८१ टक्के वाढ बघितल्या गेली. मात्र एकमेव भारतात ही वाढ ७१ टक्के होती.

Web Title: Petroleum And Natural Gas Minister Hardeep Puri Gave The Reason Why Petrol And Diesel Price Rising In India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..