esakal | राजस्थानच्या राजकारणात नवा ट्विस्ट; गृह खात्याने मागितले फोन टॅपिंग प्रकरणाचे रिपोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

On Phone Tapping Allegations Home Ministry Asks Rajasthan For Report

राजस्थानातील राजकीय वातावरण काही केल्या शांत होताना दिसत नाहीये. आता राजस्थानच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आला असून केंद्रीय गृहमंत्रालयामे फोन टॅपिंग प्रकरणात राज्याच्या प्रमुख सचिवांकडून रिपोर्ट मागितले आहेत. भारतीय जनता पक्षाने या प्रकरणावर टीका केली असून याला प्रायवसीचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे.

राजस्थानच्या राजकारणात नवा ट्विस्ट; गृह खात्याने मागितले फोन टॅपिंग प्रकरणाचे रिपोर्ट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जयपूर : राजस्थानातील राजकीय वातावरण काही केल्या शांत होताना दिसत नाहीये. आता राजस्थानच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आला असून केंद्रीय गृहमंत्रालयामे फोन टॅपिंग प्रकरणात राज्याच्या प्रमुख सचिवांकडून रिपोर्ट मागितले आहेत. भारतीय जनता पक्षाने या प्रकरणावर टीका केली असून याला प्रायवसीचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गृहमंत्रालयाने कथित रुपात व्हायरल होत असलेल्या फोन कॉल ऑडिओची कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणावर गृहमंत्रालयाच्या करडी नजर आहे. या प्रकरणाची राजस्थान पोलीस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, काँग्रेसने असा आरोप केला आहे की, ऑडिओ राजस्थानमध्ये गेहलोत सरकारला पाडण्यासाठी संजय जैनसोबत भंवर लाल शर्माचा यामध्ये आवाज आहे. यामध्ये ३० आमदारांवर भंवरलाल शर्मा आणि संजय जैन यांच्यात चर्चा होत आहे. या ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी एसओजीची टीम मानेसरमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचली. मात्र  तेथे भंवरलाल शर्मा सापडले नाहीत.

ज्या टेपच्या पुराव्यानुसार काँग्रेस भाजपचा खरा चेहरा समोर आणण्याचा दावा करत आहेत. त्यावरच भाजपने आता प्रश्नचिन्ह उभे केले आहे. भाजप प्रवक्ता संबित पात्राने म्हटलं की, राजस्थान सरकार सगळ्यांच्या प्रायव्हसीचं उल्लंघन करत आहे. कोरोनाच्या काळात जिथे लोकं व्हेंटिलेटरकरता हैराण झाले आहे तिथे काँग्रेस आमदार स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करत आहेत.