Phool Dei 2026: पहाडांत वसंताचे पाऊल! चिमुकल्यांनी सजवल्या घरांच्या चौकटी; काय आहे 'फूलदेई'ची परंपरा?

Phool Dei 2026: Spring Festival in the Hills of Uttarakhand: उत्तराखंडमध्ये वसंताचे आगमन ‘फूलदेई’च्या आनंदाने साजरे! चिमुकल्यांनी घरांच्या चौकटी फुलांनी सजवल्या, गाणी गाऊन आशीर्वाद घेतले.
Phool Dei 2026

Phool Dei 2026

esakal

Updated on

देश: उत्तराखंडच्या डोंगरदऱ्यांतून वसंताच्या आगमनाचा गंध दरवळू लागला असून, आज देवभूमीत निसर्गाचा उत्सव म्हणजेच 'फूलदेई' मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. चिमुकल्यांच्या किलबिलाटाने आणि फुलांच्या सुगंधाने संपूर्ण पहाड न्हाऊन निघाले आहेत.

भारतातील विविधतेचे दर्शन घडवणारा उत्तराखंडचा हा लोकसंस्कृतीचा सोहळा म्हणजे निसर्ग आणि मानवाच्या नात्याचे एक सुंदर प्रतीक आहे. दरवर्षी चैत्र महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा हिवाळा संपून निसर्ग कात टाकतो, तेव्हा हा सण साजरा केला जातो. हा सण निसर्गप्रती कृतज्ञतेचा आणि सामाजिक सौहार्दाचा प्रतीक आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शुभेच्छा दिल्या. उत्तराखंडच्या लोकपरंपरेतील हा सुंदर उत्सव आजही आधुनिक युगात जिवंत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com