फोटोग्राफरने मॉडेलला पोझ द्यायला लावून केला बलात्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

छायाचित्रे काढण्यासाठी तो एका गावामध्ये घेऊन गेला होता. छायाचित्रे काढत असताना विविध प्रकारे पोझ द्यायला लावली अन् बलात्कार केला.

नवी दिल्लीः एका फोटोग्राफरने मॉडेलची छायाचित्रे काढत असताना वेगवेगळी पोझ देत लावताना बलात्कार केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

उत्तर प्रदेशातील शामिली जिल्ह्यातील गुरुग्राम पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडली आहे. गुरुग्रामचे पोलिस अधिकारी सुभाष बोकन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मॉडेलने एका फोटोग्राफरच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास करत आहोत.'

मॉडेलने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'मॉडेलिंग करत असताना गोविंद नावाच्या फोटोग्राफरची सहा महिन्यापूर्वी ओळख झाली होती. छायाचित्रे काढण्यासाठी तो एका गावामध्ये घेऊन गेला होता. छायाचित्रे काढत असताना विविध प्रकारे पोझ द्यायला लावली. यावेळी त्याने बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, त्याने लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावत अश्लिल छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. शिवाय, त्याने फेसबुकवरून अश्लिल मेसेजही पाठवला, यामुळे त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Photographer raped Model on the pretext of the photoshoot