esakal | सर्व शाळांमधून सावरकरांचा फोटो हटविणार; राज्य सरकारचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

सर्व शाळांमधून सावरकरांचा फोटो हटविणार; राज्य सरकारचा निर्णय

तसेच ज्या शाळांमधून हे फोटो काढले जाणार नाहीत, त्या शाळांवर कारवाई करण्यात येईल.

सर्व शाळांमधून सावरकरांचा फोटो हटविणार; राज्य सरकारचा निर्णय

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच आता राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारने राज्यातील सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचे पत्रकच सर्व शाळांना पाठविण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसेच ज्या शाळांमधून हे फोटो काढले जाणार नाहीत, त्या शाळांवर कारवाई करण्यात येईल, असेही यामध्ये म्हटले आहे. गेहलोत सरकारच्या या निर्णयावर भाजपने आक्षेप घेतला असून, सरकार महापुरुषांमध्ये भेदभाव करत आहे, असा आरोप केला जात आहे. 

दरम्यान, राज्यातील सरकारी शाळांमधून सावरकर आणि उपाध्याय यांचे फोटो काढू देणार नाही, असा इशाराही राज्यातील भाजपच्या नेत्यांनी दिला आहे.

शिक्षणमंत्र्यांची टीका

गेहलोत सरकारच्या या निर्णयावर राजस्थानचे माजी शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी टीका केली आहे.