वेळ पडल्यास प्रवाशांना विमानातून खाली उतरवा; दिल्ली उच्च न्यायालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Airport

वेळ पडल्यास प्रवाशांना विमानातून खाली उतरवा; दिल्ली HC

नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये वाढत्या कोरोना (Corona) रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) प्रवाशांना कठोर शब्दात इशारा दिला आहे. त्यानुसार विमानतळ आणि प्रवासादरम्यान विमानात कोरोना प्रोटोकॉलचे (Corona Protocol) आणि मास्क परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांना विमानातून खाली उतरवण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. तसेच नियम न पाळणाऱ्या प्रवाशांना दंड ठोठावावा अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. विमान प्रवासादरम्यान कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल दाखल केलेल्या जनहित याचिकांवर सुनावणीदरमयान वरील आदेश दिले आहे. (Delhi High Court On Covid 19 Protocol)

हेही वाचा: "निर्बंध नको असतील तर मास्क वापरा"; मुख्यमंत्र्यांचा जनतेला इशारा

न्यायालयाने म्हटले की, कोविडमुळे जे नियम आहेत, ते लागू करणे आवश्यक आहे. यासाठी DGCA ने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवासी आणि इतरांवर कठोर कारवाई करण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अशा प्रवाशांना नो फ्लाय लिस्टमध्ये (No Fly List) टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मास्क काढण्याची सूट फक्त जेवणाच्या वेळी देण्यात आल्याचे डीजीसीएच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. मास्कसक्ती हे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यामागील एक पर्याय असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा: मुंबईतील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 6 टक्क्यांवर; अलर्ट राहण्याच्या सूचना

दरम्यान, विमान प्रवासादरम्यान अनेक प्रवासी कोरोना नियमांचे पालन करत नाही. तसेच मास्कदेखील परिधान करत नसल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. त्यानंतर याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान, न्यायालयाने कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर कोठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Physically Remove Fliers From Aircrafts If They Violate Covid Protocol Says Delhi Hc

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top