

Tim Andrews Lives Nine Months With Genetically Modified Pig Kidney Without Dialysis in World First Medical Breakthrough
sakal
नवी दिल्ली: जनुकीय बदल केलेल्या विल्मा नावाच्या डुकराच्या मूत्रपिंडासह तब्बल नऊ महिने जगणारे टिम अँड्रूज (वय ६६) हे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मान्यताप्राप्त कार्यक्रमांतर्गत पाच रुग्णांमध्ये मार्च २०२४ पासून जनुकीय बदल केलेल्या डुकराच्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले.