weekend jungle safari
sakal
उत्तर प्रदेश : प्रसिद्ध पिलीभीत व्याघ्र प्रकल्पात शनिवार आणि रविवारी जंगल सफारी करणे आता महागणार आहे. २०२६-२७च्या पर्यटन हंगामासाठी प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. भारतीय पर्यटकांसह परदेशी पर्यटकांच्या तिकिटांचे दरही वाढवण्यात आले आहेत. त्याचबरोबर व्याघ्र प्रकल्पातील विविध विकासकामांसाठी १ कोटी ९६ लाख रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे वनमंत्री डॉ. अरुण कुमार सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली पिलीभीत व्याघ्र संवर्धन फाउंडेशनच्या नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत आगामी पर्यटन हंगामातील प्रवेश शुल्क तसेच व्याघ्र प्रकल्पातील विकासकामांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.