सोने तस्करीत पिनराई विजयन यांचा सहभाग

स्वप्ना सुरेशचा धक्कादायक दावा; २०१६ पासून तस्करीत सामील
Pinarayi Vijayan involved in gold smuggling case Swapna Suresh claim
Pinarayi Vijayan involved in gold smuggling case Swapna Suresh claimsakal

तिरुअनंतपुरम : केरळमधील सोने तस्करीप्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेशने मंगळवारी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विजयन आणि त्यांचे कुटुंबीय सोने तस्करीत अनेक वर्षांपासून सामील असल्याचा धक्कादायक दावा न्यायालयात केला. मुख्यमंत्री या नात्याने पिनराई विजयन हे मध्य पूर्व आशियायी देशाच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांचा सोने तस्करीत सहभाग वाढल्याचा आरोप तिने केला आहे. यासंदर्भात तिने एर्नाकुलम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब दिला आहे.

न्यायालयातील जबाबाची पत्रकारांना माहिती देताना स्वप्ना सुरेश म्हणाल्या की, विजयन हे दुबई दौऱ्यावर असताना त्यांना पैशांनी भरलेली बॅग पाठविली होती. सोने तस्करीत मुख्यमंत्री, माजी खासगी सचिव शिवशंकर आदील, खासगी सचिव रविंद्रन यांची पत्नी कमला आणि मुलगी वीणा यांचा सहभाग असल्याचे आपण न्यायालयाला सांगितल्याचे त्या म्हणाल्या. २०१६ मध्ये वाणिज्य दुतावासात आपण वाणिज्य सचिव असताना शिवशंकर यांनी माझ्याशी संपर्क साधला.

तेव्हा त्यांनी मला सांगितले की, मुख्यमंत्री आपली बॅग घेऊन जाण्यास विसरले आहेत आणि ती बॅग तातडीने दुबईला न्यायची आहे. आम्ही वाणिज्य दूतावासात एका राजनैतिक प्रक्रियेतून बॅग पाठविली. जेव्हा ती बॅग दूतावासात आणली तेव्हा यात चलन होते. शिवशंकर यांच्या सूचनांचे पालन करत बिर्याणीने भरलेले भांडे दूतावासामार्फत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पाठविण्यात येत होते. यात बिर्याणीशिवाय अन्य काही जड वस्तू असायच्या. याबाबत आपण आताच काही सांगू शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com