
लखनौनंतर गुरुदासपूरमध्ये पिटबुलचा 13 वर्षीय मुलावर हल्ला
लखनौसारखीच घटना पंजाबमधील गुरुदासपूरमध्येही घडली आहे. एका 13 वर्षांच्या मुलावर पिटबुलने हल्ला केला. सुदैवाने मुलाचे प्राण वाचले आहेत. मात्र या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला बटाला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील कोटली भाम सिंग परिसरात १३ वर्षीय गुरप्रीत सिंग आपल्या वडिलांसोबत स्कूटरवरून जात होता. वाटेत पिटबुलने त्याच्यावर हल्ला केला. निष्पाप गुरप्रीत स्कूटरवरून खाली पडला, त्यानंतर पिटबुलने त्याचा कानाचा चावा घेतला. जीवावर खेळून पित्याने मुलाला कुत्र्यापासून वाचवले. त्याचवेळी पिटबुलचा मालक घटनास्थळावरून कुत्र्याला घेऊन घरी गेला. सद्यस्थितीत याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही.
जखमी मुलाची आजी हरदीप कौर यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा आणि नातू काही कामासाठी स्कूटरवरून दुसऱ्या गावी जात होते. वाटेत एक माणूस पिटबुलला घेऊन चालला होता. त्याची स्कूटर जवळून जाताच पिटबुलने त्याला पाहून भुंकायला सुरुवात केली आणि स्कूटरच्या मागे पळण्याचा प्रयत्न केला. मालकाच्या हातातून साखळी सुटली आणि कुत्र्याने थेट मुलाचा पाय पकडला. यामुळे मुलगा स्कूटरवरून खाली पडला आणि यादरम्यान पिटबुलने मुलाच्या कानावर हल्ला केला. हे पाहून वडिलांनी कुत्र्याला काठीने हुसकावून लावले, नाहीतर पिटबुलने मुलाचा जीव घेतला असता.
हेही वाचा: मालकिणीला मारलेल्या पिटबुलचे सरकारी पिंजऱ्यात नखरे; साधं जेवण नको पण...
पिटबुलने एका वृद्ध महिलेचा घेतला जीव
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील कैसरबाग परिसरात १२ जुलै रोजी एका पाळीव पिटबुल कुत्र्याने ८० वर्षीय महिलेवर हल्ला केला त्यात महिलेचा मृत्यू झाला. कैसरबाग पोलिस ठाण्याच्या अध्यक्षांनी सांगितले की, 80 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकावर त्यांच्या पिटबुल कुत्र्याने हल्ला केला. त्यावेळी महिला घरात एकटीच होती. त्यांचा जिम ट्रेनर मुलगा जिमला गेला होता. महिलेच्या पतीचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. मृत सुशीला त्रिपाठी या कैसरबागच्या बंगाली टोला परिसरात कुटुंबासोबत राहत होत्या. मृत महिलेचा मुलगा अमित त्रिपाठी हा अलीगंज येथील कपूरथला येथे जिम ट्रेनर आहे.
Web Title: Pitbull Attacks 13 Year Old Boy In Gurdaspur After Lucknow
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..