Pitreshwar Hanuman Dham: देशातील अनोखी हनुमान मूर्ती पाहिलीत का? इंदूरच्या पितरेश्वर धामात ध्यानमग्न अवस्थेतील बजरंगबलीचा भव्य अवतार

Pitreshwar Hanuman Dham Becomes a Major Spiritual Attraction: इंदूरमधील पितरेश्वर हनुमान धाम येथे ध्यानमग्न अवस्थेतील 72 फूट उंच भव्य हनुमानाची मूर्ती भाविकांचे आकर्षण ठरत आहे.
Pitreshwar Hanuman Dham

Pitreshwar Hanuman Dham

esakal

Updated on

मध्य प्रदेशातील सर्वात स्वच्छ आणि प्रगत शहर अशी ख्याती असलेल्या इंदूर (Indore) शहरामध्ये अध्यात्म आणि निसर्गाचा एक अद्भूत संगम पाहायला मिळत आहे. इंदूरमधील गोमटगिरी जवळील हातोद रोडवर (Hatod Road) वसलेले 'श्री पितरेश्वर हनुमान धाम' (Shri Pitreshwar Hanuman Dham) हे सध्या संपूर्ण देशातील भाविकांसाठी आणि पर्यटकांचे सर्वात मोठे श्रद्धास्थान बनले आहे. या पवित्र धामाची भव्यता आणि महती लक्षात घेऊन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि केंद्रीय ऊर्जा, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी नुकतीच या मंदिराला भेट देऊन प्रभू हनुमंताचे दर्शन घेतले.पुजाऱ्यांनी केलेल्या वैदिक मंत्रोच्चारात मुख्यमंत्र्यांनी विधीवत पूजा-अर्चा करून सर्व देशवासीयांच्या आणि प्रदेशवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com