‘कोरोनाच्या करात ४१८ अब्ज डॉलरची विक्रमी निर्यात’

 Piyush Goyal
Piyush Goyal Piyush Goyal

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या आव्हानांमध्ये भारताने गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी निर्यात केली आहे. पेट्रोलियम उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, रत्ने, दागिने आणि रसायने क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी पाहिली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताच्या मालाची निर्यात ४१८ अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (piyush goyal) यांनी सांगितले.

मार्च २०२२ मध्ये देशाने ४० अब्ज डॉलरची निर्यात केली होती. जी एका महिन्यातील निर्यातीची सर्वोच्च पातळी आहे. यापूर्वी मार्च २०२१ मध्ये निर्यातीचा आकडा ३४ अब्ज डॉलर होता. २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताने २९२ अब्ज डॉलरची निर्यात केली होती. २०२१-२२ मध्ये निर्यात ४१८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. २३ मार्च रोजी देशाने ४०० अब्ज डॉलरचा निर्यातीचा आकडा पार केला, असे पीयूष गोयल (piyush goyal) यांनी रविवारी आर्थिक वर्ष २०२१-२०२२चे व्यापार आकडे जाहीर करताना सांगितले.

 Piyush Goyal
उल्कापात की उपग्रहाचे तुकडे? चंद्रपूर जिल्ह्यात सापडले अवशेष

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात भारताच्या निर्यातीत चांगली कामगिरी करण्याचे प्रमुख कारण म्हणजे पेट्रोलियम उत्पादने, अभियांत्रिकी, रत्ने आणि दागिने, रसायने आणि फार्मा क्षेत्रातील उच्च कामगिरी. भारताने सर्वाधिक निर्यात अमेरिकेला केली. त्यानंतर संयुक्त अरब अमिराती (UAE), चीन, बांगलादेश आणि नेदरलँड्सचा क्रमांक लागतो.

हा एक मैलाचा दगड

स्वावलंबी भारत होण्याच्या दिशेने हा एक मैलाचा दगड आहे. मात्र, दोन वर्षांत कोरोना विषाणूशी संबंधित निर्बंधांमुळे पर्यटन, विमानसेवा यासारख्या क्षेत्रांतील कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. परंतु, अर्थव्यवस्थेत तीव्र सुधारणा झाल्याने ही क्षेत्रे पुन्हा रुळावर येण्याची आशा वाढली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) म्हणाले.

 Piyush Goyal
‘अगोदर हनुमान चालिसा अमित ठाकरेंना म्हणायला लावा’

अर्थव्यवस्थेला बसू शकतो धक्का

फेब्रुवारीच्या शेवटी युक्रेन युद्धामुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षात निर्यात आघाडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी कच्च्या तेलाच्या उच्च किमतीमुळे आयात बिल देखील खूप जास्त असू शकते. ज्यामुळे अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com