Awas Yojana: घरासोबत स्वयंपाकघरासाठी ६ हजार, शौचालयासाठी १२ हजार रुपये; जाणून घ्या आवास योजनेचे लाभ

PM Awas Yojana, Housing Subsidy, Uttarakhand Government अंतर्गत ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
PM Awas Yojana Gramin Supports Eligible Rural Families in Building Permanent Homes

PM Awas Yojana Gramin Supports Eligible Rural Families in Building Permanent Homes

esakal

Updated on: 

उत्तराखंड: उत्तराखंडमधील ग्रामीण भागातील बेघर आणि गरजू कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणला राज्यात गती मिळाली आहे. २०२२ पासून आतापर्यंत राज्यातील ३९ हजार ८१५ कुटुंबांना या योजनेतून पक्की घरे मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये उधमसिंह नगर जिल्ह्यात सर्वाधिक ४ हजार ८८२ घरे बांधण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार या योजनेची अंमलबजावणी करत आहे. ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना घरासोबतच स्वच्छता, पाणी, वीज आणि स्वयंपाकाच्या इंधनासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com