Independence Day : मोदींची फेट्याची परंपरा यावर्षीही कायम

वृत्तसंस्था
Thursday, 15 August 2019

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी २०१४ पासून प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला फेटा परिधान करुन देशवासींयाशी संवाद साधतात. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना फेटा घालण्याची ही परंपरा पंतप्रधान मोदिंनी यंदाही कायम राखली. 

स्वातंत्र्यदिन

2014 मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा भाषण करताना मोदींनी जोधपुरी फेटा घातला होता. त्यावेळी त्यांनी अर्ध्या बाह्याचा कुर्ता आणि चुडीदार परिधान केला होता. 

 2015 मध्ये देशवासीयांना उद्देशून भाषण करताना मोदींनी पिवळ्या रंगाचा फेटा घातला होता. त्यावर काही लाल आणि गडद हिरव्या रंगाच्या चौकटीदेखील होत्या. 

2016 मध्ये मोदींनी गुलाबी आणि पिवळा रंगाचा फेटा परिधान करुन देशवासीयांना संबोधित केलं. त्यावेळी मोदींनी पांढऱ्या रंगाचा अर्ध्या बाह्याचा कुर्ता घातला होता.

तर 2017 मध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचा फेटा परिधान केला होता आणि बंद गळ्याचा कुर्ता घातला होता. 2018 मध्ये मोदींनी केशरी रंगाचा फेटा, चुडीदार आणि पूर्ण बाह्यांचा कुर्ता घातला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM continues turban tradition for first I-Day address of Modi 2.0