PM Dhan Dhana Krishi Yojana Launched: धन-धान्य योजना शंभर जिल्ह्यांमध्ये; तब्बल २४ हजार कोटींची तरतूद
Indian Farming: पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना देशभरातील १०० जिल्ह्यांत राबवली जाणार असून, यासाठी दरवर्षी २४ हजार कोटींचा निधी खर्च होणार आहे. या योजनेमुळे १.७ कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने वार्षिक २४ हजार कोटी रुपये खर्चाच्या पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या ३६ योजनांचा समन्वय असलेली धनधान्य कृषी योजना देशभरातील शंभर जिल्ह्यांमध्ये राबविली जाणार आहे.