
चेन्नई : तमिळनाडूतील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवविण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुर्लक्ष करत असून, नुकत्याच श्रीलंका दौऱ्यादरम्यान त्यांनी कच्छथिवू बेट परत मिळविण्याबाबत कोणतीही चर्चा केली नाही, असा आरोप तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सोमवारी विधानसभेत बोलताना केला.