गोव्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'या' दिवंगत नेत्याचं नाव, PM मोदींनी केलं उद्घाटन; जाणून घ्या खासियत

PM Inaugurates goa international airport Named After former defence minister manohar parrikar rak94
PM Inaugurates goa international airport Named After former defence minister manohar parrikar rak94

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, 11 डिसेंबर 2022 रोजी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. या विमानतळाला माजी संरक्षण मंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच या विमानतळामुळे पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल असं प्रतिपादन यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केलं.

या विमानतळाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 मध्ये करण्यात आली होती. याच्या उभारणीसाठी 2 हजार 870 कोटी रुपये खर्च आला आहे. उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, मोपा विमानतळाच्या उभारणीनंतर गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. हा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पायाभूत सुविधांबाबत सरकारचे विचार प्रतिबिंबित करतात. मोदी पुढे म्हणाले की, 2 विमानतळांमुळे गोवा कार्गो हब बनण्याची शक्यता वाढली आहे.

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

PM Inaugurates goa international airport Named After former defence minister manohar parrikar rak94
Asim Sarode on Andheri ByElection : राजीनामा नाही स्वीकारला तरी अडचण नाही-कायदेतज्ज्ञ असीम सरोदे

विशेष काय आहे?

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे गोव्याच्या उत्तरेकडील भागात आहे आणि गोव्याची राजधानी पणजीपासून 35 किमी अंतरावर आहे. मार्च 2000 मध्ये केंद्र सरकारने गोवा राज्य सरकारला मोपा गावात ग्रीनफिल्ड विमानतळ बांधण्याची परवानगी दिली. पहिल्या टप्प्यात, विमानतळाची वार्षिक क्षमता सुमारे 44 लाख प्रवासी आहे, तर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, त्याची एकूण क्षमता वार्षिक 10 लाख प्रवासी इतकी होईल. हे विमानतळ दिसायला खूपच प्रेक्षणीय आहे. जगातील सर्वात मोठी विमाने हाताळण्यासाठी धावपट्टीही येथे तयार करण्यात आली आहे.

PM Inaugurates goa international airport Named After former defence minister manohar parrikar rak94
Chandrakant Patil : 'भीक' शब्दाने भाजपमध्येच मतभेद! केंद्रीय मंत्र्याने चंद्रकांत पाटलांना सुनावलं

या विमानतळावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात आला आहे. यासोबतच ग्रीन बिल्डिंग्ज, एलईडी लाईट, रिसायकलिंग अशा अनेक सुविधांनी हा सुसज्ज बनवण्यात आला आहे. डाबोलीम विमानतळाच्या तुलनेत मोपा विमानतळ अतिशय आलिशान सुविधांनी सुसज्ज आहे. रात्री डाबोलीम विमानतळावर पार्किंगची सोय नव्हती. मोपा विमानतळावर रात्रीच्या पार्किंगची सुविधा आहे, तसेच डाबोलीममध्ये कोणतेही कार्गो टर्मिनल नव्हते, तर मोपा विमानतळावर 25,000 मेट्रिक टन हाताळणी क्षमता असणारी कार्गो सुविधा असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com