शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' तारखेला खात्यात जमा होणार पैसे

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

1 डिसेंबरपासून सरकारने सर्व शेतकऱ्यांना आपल्या बँक खात्याशी आधार जोडण्यास सांगितले आहे. 29 डिसेंबरपर्यंत सरकारने 9.2 कोटी शेतकऱ्यांची माहिती गोळा केलेली आहे पश्चिम बंगालमधील 70 लाख शेतकऱ्यांना या योजनेची मदत होणार आहे.

नवी दिल्ली : नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 2 जानेवारीला पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 6 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 12 हजार कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 2 जानेवारी 2020 ला कर्नाटकातील तुमकूर येथे पंतप्रधान किसान योजनेचा शुभारंभ करणार आहेत. नव्या वर्षात शेतकऱ्यांना या योजनेद्वारे पैसे मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना 1 डिसेंबरपर्यंत 2 हजार रुपयांची मदत मिळाली असून, त्या शेतकऱ्यांना वगळून इतर शेतकऱ्यांना एकरकमी मदत देण्यात येणार आहे. आधार खाते बँक खात्याशी संलग्न असलेल्या सुमारे साडेसहा कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. 

खातेवाटप दोन दिवसांत 

1 डिसेंबरपासून सरकारने सर्व शेतकऱ्यांना आपल्या बँक खात्याशी आधार जोडण्यास सांगितले आहे. 29 डिसेंबरपर्यंत सरकारने 9.2 कोटी शेतकऱ्यांची माहिती गोळा केलेली आहे पश्चिम बंगालमधील 70 लाख शेतकऱ्यांना या योजनेची मदत होणार आहे. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 2 कोटी शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात सरकारला यश आलेले आहे. केंद्र सरकारने या योजनेसाठी 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. यातील 45 हजार कोटींचे वाटप करण्यात आले असून, आता जानेवारीत 12 हजार कोटींचे वाटप करण्यात येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM-Kisan Centre to disburse Rs 12,000 crore to 6 crore farmers on January 2