PM किसान योजनेचा दहावा हप्ता जाहीर, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना फायदा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

M Kisan Scheme 10th Installment

PM किसान योजनेचा दहावा हप्ता जाहीर, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना फायदा?

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधीचा दहावा हप्ता (PM Kisan Scheme 10th Installment) शनिवारी जाहीर करण्यात आला आहे. याबाबत पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घोषणा केली आहे. सरकारने दहाव्या हप्त्यात दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.

हेही वाचा: काँग्रेसमुळे लोकांचे स्थलांतर; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रति वर्ष 6,000 रुपयांचा चा आर्थिक लाभ दिला जातो. चार महिन्याच्या अंतराने २ हजार रुपयांचे तीन समान हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. या योजनेत आतापर्यंत या योजनेचे ९ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता सरकारने दहावा हप्ता देखील जमा केला आहे. सरकारने देशातील ११.३७ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १.५८ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली आहे. तळागाळातील शेतकर्‍यांचं सक्षमीकरण करण्यासाठी हे पैसे दिले जातात, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना फायदा? -

काही कारणास्तव काही शेतकऱ्यांना नवव्या हप्त्याचा लाभ मिळाला नव्हता. त्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे जमा झाले आहेत. एकूण चार हजार रुपये या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. पण, ज्या शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी नोंदणी केली त्यांनाच हा लाभ मिळाला आहे. पंतप्रधान सन्मान किसान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १.०५ टक्के शेतकऱ्यांना दहाव्या हप्त्याचा लाभ मिळत असून त्यांच्या खात्यात तब्बल 3828 कोटी रूपये जमा झाले, अशी माहिती मिळतेय.

तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर या क्रमांकावर करा कॉल -

तुमच्या खात्याचं स्टेटस तपासा. जर तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी जमा झाला नसेल तर तक्रार करण्यासाठी काही टोल फ्री क्रमांक देण्यात आले आहेत.

  1. टोल फ्री नंबर : 18001155266

  2. हेल्पलाइन नंबर : 155261

  3. लैंडलाइन नंबर : 011—23381092, 23382401

  4. नवीन हेल्पलाइन : 011-24300606

  5. हेल्पलाइन : 0120-6025109

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PM kisan 10th installment
loading image
go to top