
PM Kisan 19th Installment : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील भागलपूर येथून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता जाहीर केला. या हप्त्याद्वारे देशभरातील ९.८० कोटी शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. यासाठी २२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे. या रकमेचा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. यावेळी भागलपूरमध्ये किसान सन्मान निधी योजनेचा सहावा वर्धापन दिनदेखील साजरा केला जाईल.
या योजने अंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत मिळते. हे ६,००० रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात, ज्याचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित खरेदी जसे की खते, बियाणे, कीटकनाशके आणि इतर आवश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी होतो.
जर तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळालाय की नाही हे तपासायचं असेल, तर तुम्हाला अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन "Know Your Status" पर्यायावर क्लिक करावा लागेल. नंतर तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक टाकून OTP मिळवून तुमचं स्टेटस पाहू शकता.
यामध्ये बिहारमधील ७६ लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे, आणि योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर तुम्हाला योजनेशी संबंधित काही प्रश्न असतील तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक १५५२६१ किंवा ईमेल pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधू शकता.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण मदत ठरली आहे, ज्यामुळे त्यांना शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक साधने आणि संसाधने मिळवता येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.