PM Kusum Scheme : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकार देतंय सौरपंपासाठी ९० टक्के अनुदान; असा घ्या फायदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm kusum scheme

PM Kusum Scheme : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकार देतंय सौरपंपासाठी ९० टक्के अनुदान; असा घ्या फायदा

PM Kusum Scheme : केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करत असते. यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होते. अशाच एका योजनेअंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना सौरपंपांवर ९० टक्के अनुदान दिले जात आहे.

हेही वाचा: Pension News : पती-पत्नी दोघांना मिळणार दरमहा 10 हजारांचे पेन्शन; जाणून घ्या, योजना

प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत हे अनुदान दिले जात आहे. या सर्व अनुदानाचा भार केंद्र आणि राज्य सरकार उचलणार असून, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार 30-30 टक्के सबसिडी देणार आहेत. तर, 30 टक्क्यांपर्यंत कर्जाची सुविधा बँकांकडून दिली जाणार आहे.

हेही वाचा: योजना बंद झाली की काय? ३ वर्षांपासून मिळालीच नाही कर्जमाफी, तब्बल ५० हजार शेतकरी प्रतीक्षेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० ऑक्टोबर रोजी मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित करताना पंतप्रधान कुसुम योजनेचा उल्लेख केला होता. ही योजना सुरू करण्यामागे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मोदींनी सांगितले होते.

हेही वाचा: Janani Suraksha Yojana : गरोदर मातांना सरकार करणार मदत; मिळणार एवढे पैसे

कसा कराल अर्ज

केंद्र आणि राज्य सरकारकडून सौरपंपासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना सर्वात पहिले https://www.india.gov.in/ या अधिकृत संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. येथे काही महत्वाची माहितीदेखील शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.

हेही वाचा: LPG Booking Offers : LPG बुकिंगवर मिळतोय 20 टक्क्यांपर्यंतचा कॅशबॅक

अर्ज भरताना शेतकऱ्यांना आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रे, घोषणापत्र, बँक खात्याचे तपशील आदींचे तपशील द्यावे लागणार आहेत. तसेच राज्य, सौर पंपाची क्षमता, नाव आणि मोबाईल नंबररही नमुद करावा लागणार आहे. तसेच ओळखपत्राची प्रत सादर करावी लागणार आहे.