
नवी दिल्ली : ‘‘केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारची पूर्ण झालेली ११ वर्षे ही पायाभूत सुविधा क्रांतीची आहेत,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. या पायाभूत सुविधा क्रांतीला ११ वर्षे झाली असून देशात वेगाने विस्तारणारे पायाभूत सुविधांचे जाळे जीवनमान सुलभ करण्याबरोबरच समृद्धीदेखील वाढवत आहे, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.