esakal | 'कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र'
sakal

बोलून बातमी शोधा

'कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र'

'कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : कोरोनानंतर आपल्या ग्रहावरील जीवन पूर्ण बदललेले असेल, असे सांगतानाच कोरोनाची साथ अजून संपलेली नाही आणि कोविडविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित वैश्विक वैशाख ऑनलाइन संमेलनाला संबोधित करताना मोदी म्हणाले, की शतकातून एकदाच येणाऱ्या इतक्या भयंकर महासाथीच्या काळात देशाने लढाई चिकाटीने सुरू ठेवली आहे. यात डॉक्टर, आरोग्यसेवक, कोरोना योद्धे आणि वैज्ञानिक यांचे योगदान अमूल्य व कधीही न विसरता येण्यासारखे आहे. मागच्या वर्षी प्रमाणे यंदाचे हे संमेलनदेखील कोरोना योद्ध्यांना समर्पित करण्यात आले. (Vaccine absolutely important to save lives, defeat Covid: PM Modi)

मोदी म्हणाले, की अनेक दशकांनंतर मानवतेवर महासंकट आले आहे. वर्षांनंतरही कायम असलेल्या या कोरोनाच्या काळात आम्ही सातत्य आणि बदल यांचे मिश्रण अनुभवतो आहोत. भारतासह अनेक देशांनी दुसऱ्या लाटेबरोबर लढाई सुरू ठेवली आहे. प्रत्येक देशाला प्रभावित करणाऱ्या या कोरोनाने आणलेले आर्थिक संकटही तेवढेच मोठे आणि गंभीर आहे. कोविड-१९ चा प्रभाव ओसरल्यावर आपल्या ग्रहावरील जीवन पहिल्यासारखे अजिबात नसेल, असे नमूद करताना मोदी म्हणाले की मागच्या एका वर्षाच्या काळात आम्ही या आजाराचे बदलणारे स्वरूप पहिल्यापेक्षा जास्त समजून घेतले आहे.

कोरोनाला हरवण्यासाठीचे प्रभावी हत्यार असलेली लस भारताने एका वर्षात तयार केली. या कामगिरीबद्दल भारताला आपल्या वैज्ञानिकांबद्दल अभिमान वाटतो. आमचे डॉक्टर परिचारिका, आरोग्य सेवक आणि कोरोना योद्धे यांचे योगदान देश कधीही विसरणार नाही. या काळात जे मृत्युमुखी पडले त्यांना मी अभिवादन करतो, असे मोदी म्हणाले