esakal | ICS 2021 : पंतप्रधान मोदींसह मुकेश अंबानी करणार संबोधित
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi and mukesh ambani.

ICS 2021 : पंतप्रधान मोदींसह मुकेश अंबानी करणार संबोधित

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : आज आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषद २०२१ चे (ICS 2021) आयोजन करण्यात आले असून यामध्ये हरित आणि स्वच्छ ऊर्जेला प्राधान्य देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. पीचएडी चेंबर ऑफ कॉमर्स आणि पर्यावरणीय समितीच्या संयुक्त पुढाकारने आयोजित केली आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. तसेच उद्योजक मुकेश अंबानी हे प्रमुख वक्ते असतील. यामध्ये पीचएडी चेंबर, निती आयोग, पर्यावरण मंत्रालय, औद्योगिक संशोधन विभाग, सीएसआईआर आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा सहभाग असेल.

हेही वाचा: मोदी सरकारची जाहिरातबाजी! खर्च केलेत तब्बल 'इतके' हजार कोटी

भारत हा येत्या काही दिवसात हायड्रोजन तयार करणारा आणि निर्यात करणारा सर्वात मोठ देश बनेल, असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी हायड्रोजन इकोसिस्टमला सामर्थ्य देण्याच्या धोरणांवर चर्चा करण्याचा या परिषदेचा हेतू आहे. तसेच २०४० पर्यंत हायड्रोजनचे उत्पदन, साठवणूक, वाहतूक, निर्यात, वितरण शाश्वत पद्धतीने कसे केले जाईल याबाबतही यावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे भारत हरीत, स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करेल, असा विश्वासही सरकारला आहे.

उद्योजक मुकेश अंबानी हे या परिषदेत प्रमुख वक्ते आहेत. आपल्या देशातील हायड्रोजन इकोसिस्टीम प्रबळ बनविण्याच्या हेतून आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषदेचे आयोजन हे खूप मोठे पाऊल आहे. त्याचा मला आनंद आहे, असे मुकेश अंबानी यांनी कार्यक्रमाबाबत बोलताना म्हटले. तसेच याबाबत केंद्र सरकारचे कौतुक देखील केले. दरम्यान, पर्यावरण समितीचे अध्यक्ष डॉ. जे. पी गुप्ता यांनी इन्व्हेस्ट इंडियाचे सहकार्य लाभल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या परिषदेसाठी आतापर्यंत ५० पेक्षा अधिक देशांमधून नोंदणी झाली असून १५ हजारांपेक्षा अधिक प्रतिनिधी आणि ३५ पेक्षा अधिक प्रायोजक येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

loading image
go to top