PM Modi At ASEAN : आशियान समिटमध्ये PM मोदींनी चीनला डिवचलं, नेमकं काय म्हणाले? वाचा

PM Modi ASEAN-India Summit in Jakarta says co-chairing the ASEAN-India Summit is a matter of pride
PM Modi ASEAN-India Summit in Jakarta says co-chairing the ASEAN-India Summit is a matter of pride
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ASEAN (दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना) संमेलनात सहभागी होण्यासाठी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे दाखल झाले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी येथे इतर देशांच्या राष्ट्रध्यक्षांना संबोधत करताना 'वन अर्थ, वन फॅमिली' थीमबद्दल देखील भाष्य केलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, इंडो-पॅसिफीक संबंधांमध्ये आसियानचे महत्वाचे स्थान आहे. आपलं सहकार्य आता चौथ्या दशकात पोहचत आहे. ASEAN हा भारताच्या अॅक्ट इस्ट धोरणाचा आधारस्तंभ आहे. तसेच त्यांनी वैश्विक अनिश्चिततेच्या काळात देखील आपल्यात सहकार्य वाढत आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, २१व्या शतक हे आसियानचे शतक आहे, जी२०मध्ये देखील आमची थीम 'वन अर्थ, वन फॅमिली , वन फ्यूचर' आहे. यावेळी आसियान संम्मेलनचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल इंडोनिशीयाचे राष्ट्रपती जोको विदोदो यांचं अभिनंदन देखील केलं. महत्वाचे म्हणजे, चीनचे राष्ट्राध्यक्ष ASEAN संम्मेलनात सहभागी झाले नाहीत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचे या कार्यक्रमाला उपस्थित राहणे महत्वाचे मानले जात आहे.

PM Modi ASEAN-India Summit in Jakarta says co-chairing the ASEAN-India Summit is a matter of pride
G20 Summit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन आज भारतात येणार; 'अशी' असेल सुरक्षाव्यवस्था

चीन जी२०च्या थीममुळे आधीच खूप चिडलेला आहे. चीनने भारताची 'एक पृथ्वी, एक परिवार, एक भविष्य' ही थीम त्यांच्या 'वन बेल्ट वन रोड' प्रेरित असल्याचे म्हटले आहे, मात्र भारताने ही थीम वसुधेव कुटुंबकम पासून घेतली आहे. मात्र चीनकडू यावर आक्षेप घेण्यात आला अशून वसुधैव कुटुंबकम याचा अर्थ जग एक कटुंब असा होतो, पण भारताने त्यामध्ये एक भविष्य देखील दिलं आहे जो याचा भाग नाहीये.

PM Modi ASEAN-India Summit in Jakarta says co-chairing the ASEAN-India Summit is a matter of pride
Sanatana Dharma Controversy : 'हे तुमचं मत असू शकतं पण...'; उदयनिधींच्या ‘सनातन धर्मा’वरील वक्तव्यावर ठाकरे गटाची भूमिका

आसियान संमेलनात जापान, साउथ कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि भारत उपस्थित आहे. भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया क्वाडचा देखील घटक आहेत जे इंडो पॅसिफीक प्रदेशात सहयोगी देश म्हणून उदयास आले आहेत. हे देश एकत्र आल्याने चीनची मोठी अडचण झाली आहे. साउथ चायना सी भागावर हक्क सांगितल्याने देखील अनेक देशांचा चीनशी वाद सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.