modi and mamta
modi and mamta

पंतप्रधानांनी आम्हाला पुतळ्यासारखं बसवून ठेवलं; ममतांचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दहा राज्यातील जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत कोरोनाच्या परिस्थितीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणालाही बोलू दिलं नाही, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत ममता बॅनर्जी यांनी मोदी यांच्यावर आरोप केलाय. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आम्हाला पंतप्रधानांनी काहीही बोलू दिलं नाही. या बैठकीत आम्हाला पुतळ्यासारखं बसवून ठेवलं. शिवाय तेही आमच्याशी बोलले नाहीत. फक्त काही भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना या बैठकीत बोलण्याची संधी दिली होती. त्यानंतर मोदी यांनी भाषण केलं आणि बैठक संपली.' (Feel humiliated, PM Modi didn’t let us speak, says Mamata Banerjee after Covid meet)

देशातील आलेल्या कोरोना महामारीकडे मोदी सरकारचं गांभिर्यानं लक्ष नाही. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यात नदींमध्ये मृतदेह फेकले जात आहेत. तरिही अद्या केंद्राकडून कोणतीही पावलं उचलली जात आहे. राज्यांना कोरोना काळात मदत केंद्राकडून मिळत नाही. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न सुरु आहेत. पश्चिम बंगालमध्ये लसींच्या चुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यासोबतच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही आटोक्यत येत आहे. राज्यातील मृत्यूदर 0.9 टक्के इतका आहे. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत चार ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळले आहेत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

मोदी काय म्हणाले?-

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले की, कोरोनाची साथ ही गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठी आपत्ती आहे. कोरोनाने तुमच्यासमोर आव्हाने आणखी वाढवली आहेत. तुम्ही जिल्ह्यातील सर्वात मोठे योद्धे आहात आणि गावागावात असा संदेश द्यायचा आहे की गावाला कोरोनामुक्त ठेवायचं आहे. आपल्याला बराच काळ जनजागृती करावी लागणार असल्याचंही मोदी म्हणाले. देशात लसीकरण मोहिम सुरु असली तरी मोठ्या प्रमाणावर लस वाया जात आहे. त्याबद्दल चिंता व्यक्त करताना मोदी म्हणाले की, कोरोना लस वाया जात असून ते थांबवायला हवं. एक लस वाया जाणं म्हणजे एका व्यक्तीला ती मिळणार नाही. यामुळे आपण जीवन सुरक्षा कवच देऊ शकणार नाही. म्हणूनच कोरोना लस वाया जाण्यापासून रोखायला हवं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com