
नवी दिल्ली : भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पु्न्हा एकदा केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचं ५ ट्रिलियन डॉलर जीडीपीचं स्वप्न पूर्ण होणं आणखी कठीण बनलं आहे. यासंदर्भातील डेटाचा उल्लेख करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, याप्रकरणी रिझर्व्ह बँक हस्तक्षेप का करत नाही? PM Modi dream of five trillion GDP is very difficult to fulfill says Subramaniam Swamy
स्वामी म्हणाले, "आपला जीडीपी एका आठवड्यात तीन ट्रिलियन डॉलरवरुन घसरत २.९ ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ७५ हून ७७ वर पोहोचला आहे. जर हा दर ८० वर पोहोचला तर जीडीपी देखील २.८ ट्रिलियन डॉलरवर पोहोचेल. अशात ५ ट्रिलियन डॉलरचं आपलं लक्ष्य पूर्ण होणं आणखी कठीण बनलं आहे" आपल्याकडे परदेशी गंगाजळी ६४० बिलियन डॉलर इतकी आहे. याची रिझर्व्ह बँकेनं दखल देणं गरजेचं आहे. पण रिझर्व्ह बँक याची दखल का घेत नाहीए? असा सवालही त्यांनी केला.
यापूर्वीही विविध मुद्द्यांवर आपल्याच सरकारला घेरणारे भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला निशाणा बनवलं आहे. स्वामी यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विट करुन म्हटलं होतं की, "अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणात मोदी सरकार फेल झालंय. त्याचबरोबर आपण सरकारला मदत करायला तयार आहोत पण इगो यातील मोठी अडचण आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं.
काही महिन्यांपूर्वी स्वामी यांनी ट्विट करत मोदी सरकारचं रिपोर्ट कार्डही जाहीर केलं होतं. यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की, "मोदी सरकारचं रिपोर्ट कार्ड अर्थव्यवस्थेत, सीमा सुरक्षेत, परराष्ट्र धोरणात अपयशी ठरलंय, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित पेगासिस प्रकरण, अंतर्गत सुरक्षेत काश्मिरमध्ये निराशेचं वातावरण यासाठी कोण जबाबदार आहे? असा सवालही त्यांनी विचारला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.