
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या देशांचा दौरा करतील. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा असून यात कॅनडातील जी-७ देशांच्या बैठकीतील त्यांची उपस्थिती तसेच अन्य अध्यक्षांशी होणाऱ्या भेटीगाठी महत्त्वाच्या असतील.