Shinkun La : काय आहे शिंकुन ला? ज्यासाठी पीएम मोदी 15,800 फुटांवर करणार स्फोट; जाणून घ्या सविस्तर

Shinkun La tunnel worlds highest tunnel in ladakh : शिंकुन ला बोगदा प्रकल्प हा 4.1 किमी लांबीचा ड्युअल-ट्यूब बोगदा आहे जो लेहला सर्व-हवामान कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी निम्मू-पदुम-दारचा रोडवर सुमारे 15,800 फूट उंचीवर बांधला जाईल.
PM Modi first blast  of Shinkun La tunnel
PM Modi first blast of Shinkun La tunnel
Updated on

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिल विजय दिवसानिमित्त शुक्रवारी लडाखमधील द्रास येथील कारगील युद्ध स्मारकाला भेट देणार आहेत. यानंतर ते शिंकुन ला बोगद्या प्रकल्पाचा पहिला स्फोट देखील करतील. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) गुरुवारी एका निवेदनात ही माहिती दिली.

पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकल्पामुळे लेहशी सर्व प्रकारच्या हवामान स्थितीत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच हा बोगदा पूर्ण झाल्यावर तो जगातील सर्वात उंच बोगदा असेल. दरम्यान याबद्दल अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'पहिला स्फोट' महत्त्वाचा आहे कारण तो बोगद्याच्या बांधकामाची सुरुवात आहे. द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकापासून पंतप्रधान हे काम रिमोटच्या मदतीने करणार आहेत.

शिंकुन ला बोगदा प्रकल्प काय आहे?

शिंकुन ला बोगदा प्रकल्प हा 4.1 किमी लांबीचा ड्युअल-ट्यूब बोगदा आहे जो लेहला सर्व-हवामान कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी निम्मू-पदुम-दारचा रोडवर सुमारे 15,800 फूट उंचीवर बांधला जाईल. बांधकाम पूर्ण झाल्यावर हा जगातील सर्वात उंच बोगदा असेल. हा बोगदा चार वर्षांत तयार होईल, अशी अपेक्षा आहे. 15,590 फूट उंचीवर बांधलेल्या चीनच्या बोगद्याला मागे टाकून हा जगातील सर्वात उंच बोगदा असेल.

शिंकुन ला बोगद्यामुळे आपल्या सशस्त्र दलांची आणि उपकरणांची वेगाने हलचाल तर करता येईल, यासोबत लडाखच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला देखील चालना देईल. हा निम्मू-पदम-दारचा रस्ता लडाखला कनेक्टिव्हिटीचा तिसरा पर्याय ठरणार आहे.

PM Modi first blast  of Shinkun La tunnel
औषध बनवणाऱ्या सिप्ला कंपनीत कोल्हापूर, सांगलीच्या दोन तरुणांचा मृत्यू; नेमकं कुठे अन् काय घडलं?

बोगद्याची वैशिष्ट्ये

4.1 किमी लांबीचा शिंकू ला बोगदा मनाली आणि लेहमधील अंतर पूर्वीच्या 355 किमीवरून 60 किमीने कमी करून 295 किमी इतके करेल. इतकंच नाही तर मनाली-लेह आणि पारंपरिक श्रीनगर-लेह रस्त्यासाठी तो पर्याय असेल. निम्मू-पदम-दारचा रस्ता लष्कराच्या दृष्टीने देखील महत्वाचा आहे.

हा एलएसीच्या जवळ भारताच्या सर्वात उत्तरेकडील सैन्य तळ दौलत बेग ओल्डी (DBO) , याला अत्यंत आवश्यक पर्यायी कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन 1,681.5 कोटी रुपये खर्चून हा बोगदा बांधणार आहे. बोगद्यामुळे कारगिल, सियाचीन आणि नियंत्रण रेषा (LOC) सारख्या मोक्याच्या ठिकाणी अवजड यंत्रसामग्रीची वाहतूक सोपी होईल आणि प्रवासाचे अंतर सुमारे 100 किमी कमी होईल. हे बोगदे तोफ आणि क्षेपणास्त्रविरोधी असतील.

PM Modi first blast  of Shinkun La tunnel
Jasprit Bumrah: 'तो तर मीच!', भारताच्या महान कर्णधाराच्या प्रश्नावर बुमराहचं अजब उत्तर; धोनी, विराट, रोहितबद्दलही केलं भाष्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chamoli Tunnel Accident
Dadashri Calls on Youth to Choose Peace Over Conflict at Meet My Maitreya and Work for Meaningful Change
Slimnabad Tunnel
Mirya Nagpur Highway Ambaghat Tunnel latest update
Marathi News Esakal
www.esakal.com