Independence day: स्वातंत्र्यदिनी PM मोदींनी भारतीयांना दिले पाच संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं.
Independence Day
Independence Dayesakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी पाच संकल्प सांगितले.(PM Modi gave five resolutions to Indians on Independence Day )

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासीयांनी पाच संकल्प करणे आवश्यक आहे. या संकल्पातून पुन्हा एक बलसागर भारत घडवायचा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

देश आता ५ मोठे संकल्प घेऊन पुढे जाईल. हे पाच संकल्प असे -

विकसित भारत हा एकच संकल्प घेऊन आता भारत पुढे चालेल.

कोणाही भारतीयाच्या मनात गुलामीचा अंशही राहायला नको.

आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा. चौथा संकल्प म्हणजे एकता आणि एकजूट.

१३० कोटी देशवासियांच्यात एकता असयला हवी.

पाचवा संकल्प म्हणजे नागरिकांचं कर्तव्य. ज्यातून पंतप्रधान, मुख्यमंत्रीही सुटू शकत नाही.

पंतप्रधान मोदींनी पहिला संकल्प सांगितला इप्सित भारत घडवण्याचा. दुसरा संकल्प म्हणजे, गुलामीचा एकही अंश भारतातील कोणत्याही भागात नाही. तसेच यापुढेही तो राहता कामा नये. शेकडो वर्षातील गुलामीला नष्ट करायची आहे. तिसरा संकल्प म्हणजे आपल्याला आपल्या वारसा जपायचा आहे. आपल्या वारसावर आपल्याला गर्व असायला हवा. चौथा संकल्प एकतेचा आहे. पाचवा संकल्प हा नागरिकांच्या कर्तव्यांचा आहे. यामध्ये अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशाता प्रत्येक नागरिक येतो, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. तसेच भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. पुढील २५ वर्षे देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com