आमच्या प्रामाणिकपणामुळे आधीच्या सरकारचा खरा चेहरा उघड - PM मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॅगच्या मुख्यालयात PM मोदींच्या हस्ते सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅगच्या मुख्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

कॅगच्या मुख्यालयात PM मोदींच्या हस्ते सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण

ऑडिट दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॅगच्या मुख्यालयात आय़ोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅगच्या मुख्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी मोदी म्हणाले की, या महत्त्वाच्या संस्थेच्या माध्यमातून देश सेवा करणाऱ्या सर्व लोकांना ऑडिट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आतापर्यंत संस्थेच्या कामांवर शंका घेतली जात होती. पण आमच्या प्रामाणिक कामामुळे आधीच्या सरकारचा खरा चेहरा समोर आला असंही मोदी म्हणाले.

कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, देशात आधी बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता कमी होती. वेगवेगळ्या प्रकारे काम चालायचं. यामुळे बँकांच्या एनपीएमध्ये वाढ झाली. एनपीए झाकण्याचे काम केले गेले. पण आम्ही देशासमोर खरं काय ते ठेवलं. अडचणी आणि त्रुटी समजून घेतल्याने त्यावर उपाय शोधता आला असंही मोदी म्हणाले.

भारत आज जगभरात स्टार्टअप इकोसिस्टिमच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ५० हजारहून जास्त भारतीय युनिकॉर्न उभारण्यात आले आहेत. शतकातील सर्वात मोठ्या साथीचा सामना भारताने असामान्य अशा धैर्याने केला. आज आपण जगातील यशस्वी अशी लसीकरण मोहिम चालवत आहे असंही मोदींनी सांगितलं.

हेही वाचा: "लोकांनी राज्य सरकारला विचारावं, इंधन दर कपात का करत नाही"

कॅगच्या मुख्यालयात बोलताना मोदी म्हणाले की, एक संस्था म्हणून कॅग फक्त देशाच्या खात्यांचा हिशोब पाहते असं नाही तर प्रोडक्टिव्हिटीमध्ये व्हॅल्यु अॅडिशनचे कामही करते. यासाठीच ऑडिट दिन आणि त्याच्याशी संबंधित कार्यक्रम आपल्या चिंतनाचा आणि सुधारणांचा महत्त्वाचा भाग आहेत. एक वेळ अशी होती की देशातील ऑडिटकडे शंकेनं पाहिलं जात होतं, एक भीती असायची. कॅग विरुद्ध सरकार असं आपल्याला वाटत होतं. पण आज ही मानसिकता बदलली. आता ऑडिटला व्हॅल्यु एडिशनचा महत्त्वाचा भाग मानलं जातं असंही मोदींनी म्हटलं.

loading image
go to top