पूर्वांचलला नऊ वैद्यकीय महाविद्यालये

उद््‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका
narendra modi
narendra modisakal media

सिद्धार्थनगर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील पूर्वांचल प्रदेशामध्ये उत्तर भारताचे ‘मेडिकल हब’ बनण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. उत्तर प्रदेशात नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्यावेळी, ते बोलत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान पुढे म्हणाले, की पूर्व उत्तर प्रदेशसह संपूर्ण राज्यासाठी आजचा दिवस अभिमानास्पद आहे. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधेसाठी दुहेरी डोस आहे. नवीन महाविद्यालयांबरोबरच आता उत्तर प्रदेशात पाच हजार नवीन डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध झाले आहेत. पूर्व उत्तर प्रदेशातील तरुणांचे वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न आता सत्यात उतरले आहे.

यावेळी पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील पूर्वीच्या सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले, की राज्यातील यापूर्वीच्या सरकारने पूर्वांचलमधील जनतेला आजारांच्या विळख्यात सोडून दिले. आरोग्य सुविधा निर्माण न करून पूर्वांचलची प्रतिमा धुळीस मिळविली.

"उत्तर प्रदेशमध्ये यापूर्वी नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे कधी उद्‌घाटन झाले का? राज्यातील यापूर्वीचे सरकार केवळ आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवत असे. त्यांचे राजकीय प्राधान्यक्रम वेगळे होते. मात्र, गरीबांचे पैसे वाचवून त्यांना सुविधा देण्यास आमच्या सरकारचे प्राधान्य आहे."

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com