
दोन वर्षांपासून असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतही भारताने मोठे यश मिळवलं आहे. भारताने 400 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंच्या निर्यातीचे लक्ष्य गाठले आहे. विशेष म्हणजे हे लक्ष्य भारत सरकारने निश्चित केलेल्या कालावधीच्या ९ दिवस आधी पूर्ण करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी ट्विट करून ही माहिती दिली. आकडेवारीनुसार, भारतातून दररोज सरासरी 1 अब्ज डॉलरची निर्यात होते. त्याच वेळी दर महिन्याला साधारणपणे 33 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात होते. (India achieved export of 400 billion first time; Achievement ahead of schedule)
'आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा'-
भारताच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. पंतप्रधानांनी लिहिले, 'भारताने प्रथमच 400 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंच्या निर्यातीचे लक्ष्य गाठले आहे. या यशाबद्दल मी आमचे शेतकरी, विणकर, एमएसएमई, उत्पादक आणि निर्यातदार यांचे अभिनंदन करतो. आमच्या आत्मनिर्भर भारत प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये सांगितले आहे की, सरकारने मुदतीच्या ९ दिवस आधी हे लक्ष्य गाठले आहे.
आयात वाढल्याने व्यापार तूटही वाढली-
कच्च्या तेल आणि सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारताची आयातही ३६ टक्क्यांनी वाढली आहे. या कारणास्तव, जानेवारीमध्ये 17.4 अब्ज डॉलरची व्यापार तूट फेब्रुवारीमध्ये 20.9 अब्ज डॉलर झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे किमतीत वाढ होऊनही भारताच्या सेवा आणि उत्पादन फेब्रुवारीमध्ये स्थिर राहिले. ब्लूमबर्ग न्यूजने संकलित केलेले सर्व आठ हाई फ्रीक्वेंसी इंडिकेटर्स स्थिरता दर्शवतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.