
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असून शनिवारी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं जाऊन आदरांजली वाहिली.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असून शनिवारी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं जाऊन आदरांजली वाहिली. मोदींनी ट्विटरवरून म्हटलं की, राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचे अग्रदूत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली.
गुजरातमधील केवाडिया इथं असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं मोदींनी सरदार पटेल यांच्या भव्य पुतळ्याला पुष्पांजली वाहिली. त्यानंतर सी प्लेनचं उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याआधी राष्ट्रीय एकता दिवसच्या परेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.
Kevadia: Prime Minister Narendra Modi at 'Rashtriya Ekta Diwas' parade on the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel#Gujarat pic.twitter.com/1C0xccS4zF
— ANI (@ANI) October 31, 2020
Kevadia: Prime Minister Narendra Modi at 'Rashtriya Ekta Diwas' parade on the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel#Gujarat pic.twitter.com/1C0xccS4zF
— ANI (@ANI) October 31, 2020
सी प्लेनचं करणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी एक वाजता एरो़ड्रमचं उद्घाटन करणार असून यासोबत साबरमती रिव्हरफ्रंट ते केवाडिया अशा सीप्लेनचं उद्घाटनही करणार आहेत. जमीन आणि पाण्यावर उड्डाण करणाऱ्या सी प्लेनचं उद्घाटन करण्यात येणार असून फक्त 300 मीटर रनवेवरून ते उड्डाण करू शकते. यासाठी एखाद्या जलाशयातील 300 मीटर धावपट्टीचासुद्धा वापर शक्य आहे. हे अॅफिबियस कॅटेगरीतील विमान असून यातून एकावेळी 19 जण प्रवास करू शकतात.