esakal | शिक्षक पर्व २०२१ : पंतप्रधान मोदींनी सुरू केले महत्वाचे उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

शिक्षक पर्व २०२१ : पंतप्रधान मोदींनी सुरू केले महत्वाचे उपक्रम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : 'सबका साथ', 'सबका विकास', 'सबका विश्वास' यासोबत 'सबका प्रयास' ही आपली प्रमुख कल्पना आहे. कोरोना काळात शिक्षकांनी अतिशय चांगले काम केले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाते हे औपचारीक नसून एखाद्या कुटुंबासारखे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) म्हणाले. आज पंतप्रधान मोदी यांनी 'शिक्षक पर्व २०२१' (shikshak parva 2021) च्या निमित्ताने राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा (national education policy) एक भाग म्हणून अनेक महत्वाचे उपक्रम सुरू केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

5 ते 17 सप्टेंबर 2021 पर्यंत देशभरात शिक्षक पर्व 2021 साजरा केला जात आहे. आज अनेक प्रमुख उपक्रम सुरू करण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोश आणि बोलणारी पुस्तके तयार करण्यात आली असून त्याचा फायदा अपंग व्यक्तींना होणार आहे. यामध्ये हजारापेक्षा जास्त शब्दांचा संग्रह आहे आणि लवकरच अभ्याक्रमामध्ये समावेश केला जाणार आहे. तसेच सीबीएसईची शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि मान्यता फ्रेमवर्क (SQAAF), NIPUN भारतसाठी NISHTHA शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आणि शाळेच्या विकासासाठी स्वयंसेवक, देणगीदार आणि सीएसआर योगदान देणाऱ्यांच्या सोयीसाठी विद्यांजली पोर्टल या उपक्रमांचा समावेश आहे. NISHTHA प्रशिक्षण कार्यक्रम शिक्षकांना नवीन प्रणाली आणि तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेण्यास मदत करतील. यामुळे शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा वाढेल आणि विद्यार्थी भविष्यासाठी तयार राहतील, असाही विश्वास मोदींनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिक्षण क्षेत्रातील भागीदारांचे कौतुक केले. तसेच शिक्षक, शैक्षणिक प्रशासन आणि भागादारांसोबत सामान्य जनतेही राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये सहभाग वाढवावा, असेही मोदी म्हणाले.

हेही वाचा: 'मोदी एक्स्प्रेस'कोकणला रवाना; रावसाहेब दानवेंचा हिरवा झेंडा

शिक्षक पर्व 2021 रोजी पंतप्रधान मोदींनी खासगी क्षेत्राला पुढे येऊन शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याचे आवाहन केले. विशेषतः सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा विचार करावा, असेही ते म्हणाले. त्यांनी नॅशनल डिजिटल एज्युकेशनल आर्किटेक्चर (N-DEAR) आणि शिक्षण क्षेत्रातील असमानता दूर करण्यात कशी मदत होईल याबद्दल सांगितले. हे सर्व शैक्षणिक उपक्रमांमध्ये एक सुपर-कनेक्ट म्हणून काम करेल, असेही मोदी म्हणाले.

loading image
go to top