Mera Yuva Bharat Portal
Mera Yuva Bharat PortaleSakal

MY Bharat : मेरी माटी मेरा देश-अमृत कलश यात्रेचा समारोप; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'मेरा युवा भारत पोर्टल' लाँच

मंगळवारी दिल्लीमध्ये मेरी माटी मेरा देश-अमृत कलश यात्रेचा समारोप झाला.
Published on

मंगळवारी दिल्लीमध्ये मेरी माटी मेरा देश-अमृत कलश यात्रेचा समारोप झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'मेरा युवा भारत पोर्टल' लाँच करण्यात आले.

पंतप्रधान मोदींनी यावेळी दिल्लीमधील कर्तव्य पथावर अमृत कलशमध्ये माती अर्पण केली, यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, की आपल्या देशाने राजपथापासून कर्तव्य पथापर्यंत प्रवास केला आहे. "सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने कर्तव्य पथावर महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या संख्येने लोक दांडी यात्रेवेळी एकत्र आले होते, त्याच संख्येने आझादी का अमृत महोत्सव मध्ये लोक एकत्र आले."

"आता 'कर्तव्य पथा'वर 'आझाद हिंद सरकार'च्या पहिल्या पंतप्रधानांचा पुतळा आहे. आता आपल्या नौदलाला छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरित करणारे नवे बोधचिन्ह आहे. अंदमान निकोबार बेटांना त्यांची स्वदेशी नावं मिळाली आहे. याच काळामध्ये 'जनजातीय गौरव दिवस' आणि 'वीर बाल दिवस' यांची देखील घोषणा करण्यात आली. ब्रिटिश वसाहतवादी मानसिकतेतून आपण देशाला बाहेर काढलं". असंही PM मोदी म्हणाले.

Mera Yuva Bharat Portal
Modi Government : मोदी सरकारची खास योजना! सोनार, कुंभार, चांभार, सुतारासह 'या' 18 व्यावसायिकांना आता २ लाखांचे तारणमुक्‍त कर्ज

मेरा युवा भारत पोर्टल

यावेळी पंतप्रधान मोदींनी व्हर्चुअली 'मेरा युवा भारत पोर्टल' (MY Bharat) लाँच केले. या माध्यमातून सरकार युवकांच्या विकासासाठी पावलं उचलणार आहे. ही एक स्वायत्त संस्था असणार आहे. याचे उद्दिष्ट तरुणांच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवणे, तसंच सरकार आणि नागरिक यांच्यामधील युवा सेतू म्हणून तरुणांनी काम करावं असा आहे. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com