Lok Sabha Election Result : सत्ता आल्यास पहिल्या १०० दिवसात काय करणार? लोकसभेच्या निकालापूर्वी PM मोदींची अधिकाऱ्यांसोबत खलबतं

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी मोदी यांनी विविध विषयांच्या अनुषंगाने बैठका घेतल्या.
PM Modi meeting with senior officials over first 100 days if NDA comes to power lok sabha election 2024
PM Modi meeting with senior officials over first 100 days if NDA comes to power lok sabha election 2024

नवी दिल्ली : केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता आली तर पहिल्या शंभर दिवसांत कोणकोणती कामे करायची, या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत खलबते केली. देशाच्या काही भागात आलेली उष्णतेची लाट तसेच मॉन्सूनच्या तयारीचा आढावाही त्यांनी वेगळ्या बैठकांमध्ये घेतला. रेमल चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मोदी यांनी या बैठकीत दिले.

लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी मोदी यांनी विविध विषयांच्या अनुषंगाने बैठका घेतल्या. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या आधी त्यांनी, तिसऱ्यांदा सरकार सत्तेत आल्यास पहिल्या १०० दिवसांत कोणकोणती कामे करायची, याची माहिती मंत्र्यांकडून मागवली होती. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये पुन्हा मोदी सरकार सत्तेत येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी बैठका घेत पुढील काही दिवसांत करायच्या कामांचा आढावा घेतला.

PM Modi meeting with senior officials over first 100 days if NDA comes to power lok sabha election 2024
Nandurbar Lok Sabha Constituency : निकालाचे काऊंट डाऊन सुरू! भाजप-कॉंग्रेसच्या नेते -पदाधिकाऱ्यांमध्ये वाढली धकधक

अजेंडा राबविण्यासाठी गट

शंभर दिवसांच्या कामांचा अजेंडा राबविण्यासाठी दहा गट तयार करण्यात आले आहेत. या गटांचे नेतृत्व सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. हे सचिव आजच्या बैठकीस उपस्थित होते. उष्णतेची लाट आणि मॉन्सूनच्या तयारीच्या अनुषंगाने मोदी यांनी घेतलेल्या बैठकीस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हवामान खात्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ईशान्य भारत, प. बंगालचा काही भाग आणि ओडिशामध्ये रेमल चक्रीवादळाने हाहाकार उडवला होता. या भागात सुरु असलेल्या मदतकार्याचा मोदी यांनी आढावा घेतला.

PM Modi meeting with senior officials over first 100 days if NDA comes to power lok sabha election 2024
Pune Car Crash: फील्ड ऑपरेशन, टेक्निकल ॲनालिसिस...पुणे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या 12 टीम, 100 पोलीस, तपासात काय समोर आलं?

मदत पुरविण्याच्या सूचना


मिझोराम, आसाम, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मागील काही दिवसांत आलेला पूर आणि भूस्लखनामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या विषयावर बैठकांमध्ये चर्चा झाली. वरील राज्यांना आवश्यक ती मदत पुरवण्याच्या सूचना पंतप्रधान मोदी यांनी दिल्या. नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचना याआधीच मोदी यांनी दिल्या होत्या. येत्या पाच तारखेला जागतिक पर्यावरण दिवस आहे. हा दिवस साजरा करण्याच्या विषयावरही चर्चा झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com