

PM Modi Accuses Congress-RJD of Chhath Puja Insult
Sakal
छप्रा/ मुझफ्फरपूर : काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी (आरजेडी) छटी मय्याचा अपमान केला आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील प्रचारसभेत बोलताना गुरुवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुजफ्फरपूर आणि छप्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत सहभागी होत उपस्थितांना संबोधित केले. अयोध्येतील राम मंदिराबाबतही विरोधकांना अडचण आहे. मात्र मतांसाठी घुसखोरांचे संरक्षण आणि लांगुलचालन करत आहेत, असा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी केला.