
PM Modi: अंदमानमधील 21 निनाव बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे
अंदमान-निकोबार येथील जी २१ निनावी बेटे होती त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावं देण्यात आली आहे. (PM Modi names 21 largest unnamed islands of Andaman Nicobar after Param Vir Chakra awardees )
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटांवर एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली होती.
यावेळी अंदमान निकोबारमधील २१ बेटांना नावं देण्यात आली. या बेटांना अद्याप नावे नव्हती. आतापर्यंत ते फक्त अंदमान निकोबार बेटांच्या नावाने ओळखले जात होते. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी अंदमान आणि निकोबारच्या 21 बेटांना देशातील 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावं दिली आहेत.
INS Vagir : शत्रुची धडधड वाढली! 'INS वागीर' नौदलात दाखल; खास आहेत वैशिष्ट्ये
मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि कॅप्टन (तत्कालीन लान्स नाईक) करम सिंग, द्वितीय लेफ्टनंट रामा राघोबा राणे, नाईक जदुनाथ सिंग, मेजर शैतान सिंग, कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोर्जी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एकका यांच्या नावावरून या बेटांची नावे देण्यात आली आहेत.
Gujrat Court : 'गायीपासून धर्माची निर्मिती, गोहत्या थांबली तर पृथ्वीवरील सर्व प्रश्न सुटतील'
मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखॉन, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सुभेदार बाना सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, सुभेदार मेजर संजय कुमार आणि सुभेदार मेजर योगेंद्र सिंह यादव (सेवानिवृत्त) वीर चक्र विजेत्यांच्या नावावर आहे.