PM Modi Parliament Canteen : ''SPG ने नकार दिला तरीही मी पाकिस्तानात गेलो'', खासदारांसोबत जेवतांना मोदींनी सांगितला 'तो' किस्सा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संसदेच्या कँटिनमध्ये खासदारांसोबत लंच केलं. यावेळी भाजप खासदार हीना गावित, एस. फांगनोन कोन्याक, टीडीपी खासदार राममोहन नायडू, बसपा खासदार रितेश पांडे यांची उपस्थिती होती.
PM Modi Parliament Canteen
PM Modi Parliament Canteenesakal

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संसदेच्या कँटिनमध्ये खासदारांसोबत लंच केलं. यावेळी भाजप खासदार हीना गावित, एस. फांगनोन कोन्याक, टीडीपी खासदार राममोहन नायडू, बसपा खासदार रितेश पांडे आणि भाजप खासदार सस्मित पात्रा यांच्यासह एनके प्रेमचंद यांची उपस्थिती होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदारांना औपचारिक लंचबद्दल अडीच वाजता फोनद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी पंतप्रधान म्हणाले, चला आज तुम्हाला एक सजा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत खासदारांनी शाकाहारी जेवण केलं. जेवणावेळी सुरु असलेल्या चर्चेत एका खासदाराने त्यांना नवाज शरीफ यांच्या भेटीबद्दल विचारलं. त्यावेळी पंतप्रधानांनी अचानक ठरलेल्या पाकिस्तान दौऱ्याची माहिती दिली.

PM Modi Parliament Canteen
Joe Biden : ‘‘माझी स्मरणशक्ती शाबूत आहे", बायडेन यांनी ठणकावले; गोपनीय अहवालातील विधाने फेटाळली

मोदी म्हणाले की, मी त्यादिवशी दोन वाजेपर्यंत संसदेत होतो. त्यानंतर अफगाणिस्तानसाठी रवाना झालो. माघारी येत असताना त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र SPG अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने असं करण्यास नकार दिला.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, एसपीजीने विरोध करुनही मी नवाज शरीफ यांना फोन केला आणि रिसीव्ह करायला येणार का, असं विचारलं. त्यानंतर पाकिस्तानात गेलो.

PM Modi Parliament Canteen
U19 World Cup Final : बुमराहकडून मिळाल्या टिप्स, खतरनाक 'यॉर्कर' टाकणारा नमन तिवारी आहे तरी कोण?

मोदींनी खासदारांसोबत चर्चा करताना, आयुष्यातील अनुभव आणि योगाबद्दल माहिती दिली. खिचडी हा माझा आवडता पदार्थ असल्याचं त्यांनी सांगितलं. ''कधी कधी माझा एवढा प्रवास होतो की मला कळतच नाही की मी एक दिवसही झोपलेलो नाही.'' असं म्हणत मोदींनी देशासाठी घेत असलेल्या कष्टाबद्दल सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com