PM मोदींनी केलं शास्त्रज्ञांचं कौतुक; झायडस कॅडीलाच्या लशीला मंजूरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pm Modi

PM मोदींनी केलं शास्त्रज्ञांचं कौतुक; झायडस कॅडीलाच्या लशीला मंजूरी

नवी दिल्ली : आज झायडस कॅडिलाच्या ZyCoV-D साठी DCGI कडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. देशात स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या करोना लसीला मान्यता मिळाली आहे. या मान्यतेनंतर वय वर्षे १२ आणि त्यावरील मुलांना आणि प्रौढांना लस मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याबाबत आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं आहे. मोदींनी म्हटलंय की, भारत पूर्ण जोमाने कोविड -19 शी लढत आहे. झायडस कॅडीलाच्या जगातील पहिल्या डीएनए आधारित 'ZyCov-D' लसीला मान्यता मिळाली आहे. ही मान्यता म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांच्या नाविन्यपूर्ण उत्साहाची साक्ष आहे. खरंच एक महत्त्वाचा पराक्रम आहे.

हेही वाचा: बारा वर्षांवरील मुलांना मिळणार लस; 'झायडस कॅडीला'ला DCGI कडून मंजूरी

विषय तज्ज्ञ समितीच्या सल्ल्यानुसार, तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याच्या वैद्यकीय चाचणीच्या निकालांचे मूल्यमापन केल्यानंतर, सीडीएससीओने कॅडिला हेल्थकेअरच्या डीएनए कोविड -19 लसीला (ZyCoV-D) 12 वर्ष आणि त्याहून अधिक वर्षे वयाच्या लोकांसाठी भारतात आणीबाणीच्या परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी मंजूरी दिली आहे, असं ट्विट Central Drugs Standard Control Organisation (CDSCO) ने केलं आहे. कोविड 19 साठी जगातील पहिली आणि भारताची स्वदेशी विकसित डीएनएवर आधारित लस आहे. ही लस वय 12 वर्षे आणि त्यावरील मुले आणि प्रौढांना दिली जाईल. याबाबतची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिली आहे. भारतात वापरली जाणारी सहावी लस ठरणार आहे.

हेही वाचा: विरोधकांचा 'हम साथ साथ है..' शो; शरद पवारांची भूमिका लक्षवेधी

काय आहे ही लस?

या लसीची भारतात सर्वांत मोठी चाचणी घेतली गेली होती. ५० हून अधिक केंद्रांवर या लसीची चाचणी घेण्यात आली होती. याप्रकारे एखाद्या भारतीय कंपनीने तयार केलेली जगातील पहिलीच डीएनएवर आधारित असलेली लस आहे. हा दावा झायडसने केला आहे. या लसीचे तीन डोस द्यावे लागणार आहेत. अहमदाबादमधील फार्मास्युटिकल कंपनी असेल्या झायडस कॅडिलाने १ जुलै रोजी जॉयकोव्ह-डी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे मंजुरी मागितली होती. देशात आतापर्यंत सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस असलेल्या लसीला परवानगी दिली आहे.

Web Title: Pm Modi Praises Indian Scientists Zydus Cadila Vaccine Approved

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..