
Bengal News
Sakal
दार्जिलिंग : दार्जिलिंग येथे झालेल्या भूस्खलनांमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दार्जिलिंग जिल्ह्यातील मिरीक येथे मंगळवारी भेट दिली. ‘‘पीडित कुटुंबांना मदत आणि साहाय्य पुरविणे याला केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे,’’ असे त्यांनी यावेळी सांगितले. येथे झालेल्या जीवितहानी व मालमत्तेच्या नुकसानाबद्दलही त्यांनी शोक व्यक्त केला. तसेच ‘‘केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन तसेच एनडीआरएफ व एसएसबी (सीमा सुरक्षा बल) यांसह विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे’’ असेही त्यांनी यावेळी नमूद केले.