.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली : हवामानाशी जुळवून घेणाऱ्या जैवसंवर्धनयुक्त अशा १०९ वाणांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता. ११) पुसा कॅम्पसमध्ये करण्यात आले. ६१ पिकांच्या १०९ वाणांचे लोकार्पण करण्यात आल्यानंतर मोदी यांनी शेतकरी आणि कृषी वैज्ञानिकांशी संवाद साधला.