esakal | मोदीं मंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्री कोट्यधीश, तर 42 टक्के...
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींच्या मंत्रिमंडळात 90 टक्के मंत्री कोट्यधीश, तर 42 टक्के...

मोदींच्या मंत्रिमंडळात 90 टक्के मंत्री कोट्यधीश, तर 42 टक्के...

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गुरुवारी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार केला. यावेळी अनेक विद्यमान मंत्र्यांचा राजीनामा घेतला, तर अनेकांच्या खांद्यावर नवी जबाबदारी सोपविली. मोदी मंत्रिमंडळात सध्या 78 मंत्र्यांचा समावेश आहे. आधीच्या मंत्रिपरिषदेचे सरासरी वय ६१ वर्षे होते. आता फेरबदलानंतर नव्या मंत्रिपरिषदेचे सरासरी वय ५८ वर्षे एवढे झाले आहे. ‘सत्तेवर मजबूत पकड’ आणि ‘चुकांच्या सुधारणांचा प्रयत्न’ अशा शब्दांत या मंत्रिमंडळ विस्ताराचे वर्णन करता येईल. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्र्यांवर विविध गुन्ह्याची नोंद आहे. तर 90 टक्के मंत्री कोट्यधीश आहे. हा खुलासा निवडणूकीसाठी काम करणाऱ्या एडीआर समुहाचा आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळात गुरुवारी 15 केंद्रीय मंत्री आणि 28 राज्य मंत्री यांचा समावेश झाला आहे.

कोट्यधीश मंत्री -

एकूण 78 मंत्र्यांपैकी 70 मंत्री कोट्यधीश आहेत. जो मंत्रिमंडळातील 90 टक्के हिस्सा आहेत. यामधील प्रत्येक मंत्र्याची सरासरी संपत्ती 16.24 कोटी रुपये होते. 50 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असणारे चार मंत्री मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहभागी आहेत. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, पियूष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे. मोदी मंत्रिमंडळातील 8 नेत्यांची संपत्ती एक कोटींपेक्षा कमी आहे. यामध्ये जॉन बारला, प्रतिमा भौमिक, व्ही. मुरालीधरन, रामेश्वर तेली, कैलाश चौधरी, बिश्वेश्वर टूडु, शांतनु ठाकुर आणि निशिथ प्रमाणिक यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात कमी संपत्ती नितीश प्रमाणिक यांची आहे. निवडणूक आयोगानुसार नितीश यांची संपत्ती फक्त सहा लाख रुपये इतकी आहे.

हेही वाचा: ...तरच विधानसभा अध्यक्षपद स्वीकारणार - भास्कर जाधव

या नेत्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद -

रिपोर्ट्सनुसार पश्चिम बंगालमधील अलीपूर मतदार संघाचे खासदार आणि राज्यमंत्री जॉन बरला यांच्यावर 24 गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. तसेच गृह राज्य मंत्री निशिथ प्रमाणिक यांच्याविरोधात हत्याचे गुन्हा दाखल आहे. यांच्याविरोधात 21 विविध कलमाअंतर्गत गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत. निशिथ प्रमाणिक फक्त 35 वर्षांचे आहेत. मोदी मंत्रिमंडळातील सर्वात युवा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. व्ही मुरलीधरन, शोभा करंदलाजे, नित्यानंद राय, गिरिराज सिंह , प्रहलाद जोशी आणि नितिन गडकरी यांच्यासह अन्य नेत्यांवर विविध गुन्ह्याची नोंद आहे.

loading image