
नवी दिल्ली : ‘‘आणीबाणी लादणाऱ्यांचा इरादा केवळ राज्यघटनेची हत्या करण्याचा नव्हता तर न्यायपालिकेलाही त्यांना गुलाम बनवायचे होते,’’ असे सांगतानाच आणीबाणी लादणाऱ्यांना अखेर जनता जनार्दनापुढे पराभूत व्हावे लागले, अशी टिपणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना केली. ‘मन की बात’ चा हा १२३ वा कार्यक्रम होता.