
गांधीनगर : ‘भारताच्या लष्करापुढे काहीही चालत नसल्यानेच पाकिस्तानने सीमापार दहशतवादाचा वापर करून भारताविरुद्ध छुपे युद्ध सुरू केले. दहशतवाद हे छुपे युद्ध नसून पाकिस्तानची युद्धनीती आहे. पाकिस्तानने भारतावर युद्ध लादले आहे,’’ असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर आज (२७ मे) केला.