
सिवान (बिहार) : ‘राष्ट्रीय जनता दलाने (राजद) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला असून वारंवार मागणी करूनही ते माफी देखील मागत नाहीत. राजद आणि काँग्रेस पक्ष स्वत:ला डॉ. आंबेडकर यांच्यापेक्षा मोठे असल्याचे दाखवत आहेत आणि त्यामुळेच त्यांनी अवमान केला. मात्र डॉ. आंबेडकर हे मोदींच्या हृदयात आहेत. बिहारची जनता आंबेडकरांचा अपमान कधीही विसरू शकत नाही,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजदच्या नेत्यांवर केली. सिवान येथे आयोजित सभेत त्यांनी कॉंग्रेस आणि राजदवर भाषणातून हल्लाबोल केला.