PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ‘वेव्हज्’चे उद्घाटन; सर्जनशीलअर्थव्यवस्थेला मिळणार कलाटणी
WAVES 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (WAVES) उद्घाटन मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. या परिषदेमुळे सर्जनशील अर्थव्यवस्थेला नवा बूस्ट मिळणार आहे.
मुंबई : देशातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज्) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १) जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र सरकार भूषविणार आहे.