
पंतप्रधान मोदींचं Twitter अकाउंट हॅक; सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाउंट हॅक (PM Modi Twitter Account Hacked) झालं आहे. याबाबत पीएमओ कार्यालयाकडून (PMO Office) माहिती देण्यात आली आहे. हॅक झालेल्या वेळेत मोदींच्या अकाउंटवरून कुठलंही ट्विट केलं असेल त्याकडे दुर्लक्ष करा, असा सांगण्यात आलं आहे. पण, या घटनेमुळे सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा: लोक उगाच श्रेय घेतात; PM मोदी असं कुणाला म्हणाले?
मोदींच्या अकाउंटवरून मध्यरात्री २ वाजून ११ मिनिटांनी बीटकॉईन संबंधित एक फसवं ट्विट करण्यात आलं आहे. भारताने बीटकॉईनला कायदेशीर मान्यता दिल्याचं या ट्विटमधून म्हटलं आहे. सरकारने ५०० बीटकॉईनची खरेदी केली असून देशवायिसांना दिले जाईल,असं हे ट्विट होतं.

२.११ वाजता मोदींच्या अकाऊंटवरून केलेलं ट्विट
दोन मिनिटात हे ट्विट डिलीट करण्यात आलं. त्यानंतर २.१४ वाजता आणखी पहिल्या ट्विटसारखंच दुसरं ट्विट करण्यात आलं. त्यानंतर हे ट्विट देखील डिलिट झाले. यासंबंधी पीएमओ कार्यालयाने एक ट्विट करून काही वेळासाठी मोदींचं अकाउंट हॅक झालं होतं. या वेळेत मोदींच्या अकाउंटवरून कुठलंही ट्विट केलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा, असं पीएमओने म्हटलं आहे.

2.14 वाजता मोदींच्या अकाऊंटवरून केलेलं ट्विट
पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाउंट हॅक कसं काय झालं? असं अनेकांनी ट्विटरवर विचारलं. तसेच अनेक युजर्सने हॅक झालेल्या वेळेत बीटकॉईन संबंधित केलेल्या ट्विटचे स्क्रीनशॉट्स घेतले. तसेच सायबर सुरक्षेच्या दृष्टीने हे गंभीर असल्याचं अनेकांचं म्हणण आहे. या हॅकींगनंतर अनेकांनी क्रीप्टो करंसीवर देखील बंदी घालण्याची मागणी केली आहे.
Web Title: Pm Modi Twitter Account Hacked For Sometimes Shared Post Of Bitcoin Officially Permit In India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..