PM मोदींच्या मतदार संघातला हा फोटो का होतोय व्हायरल? : Viral Photo | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Varanasi

Viral Photo : PM मोदींच्या मतदार संघातला हा फोटो का होतोय व्हायरल?

Modi's Constituency Varanasi Photo viral: पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो वारासणीतील घाटांवर मृतदेहांवर होणाऱ्या अंत्यसंस्काराचे वास्तव दर्शवतो. वाराणसीतील एका समाजाला आजही जातीय भेदभावाचा सामना करावा लागत आहे. दलित आणि अनुसूचित जातींमधून येणाऱ्या डोम समाजाला आजही भेदभाव सहन करावा लागत आहे. वारासणीतील घाटांवर मृतदेहांचे अंत्यसंस्कार करणे हे या समाजाचे प्रमुख काम. सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत या लोकांचा संपूर्ण दिवस मृतदेहांसोबतच जातो. एवढेच नाही तर हे लोकं अंत्यसंस्कारानंतर वाचलेल्या लाकडांवरच अन्न शिजवतात. याच कारणामुळे आजही या लोकांकडे अस्पृश्यतेच्या दृष्टीने पाहिले जाते.

इतर लोकं या समाजाच्या व्यक्तींच्या हातचे पाणी देखील पित नाहीत. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी निवडणुकीदरम्यान डोम राजाला प्रस्तावक देखील बनवले होते. याशिवाय, मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. मात्र, आजही या समाजाकडे अस्पृश्यतेच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

डोम समाज नक्की कोण आहे?

जगदीश चौधरी यांची डोम राजा म्हणून ओळख होती. एप्रिल २०२० मध्ये मृत्यूनंतर त्यांचा १७ वर्षीय मुलगा ओम चौधरीला राजा घोषित करण्यात आले. डोम समाजातून येणारे जगदीश चौधरी हे वारासणीच्या घाटांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ओळखले जायचे. वाराणसीच्या दोन घाटांवर केवळ याच समाजाचे लोकं अंत्यसंस्कार पार पाडतात.

करावा लागतोय जातिभेदाचा सामना

२१व्या शतकात देखील डोम समुदायातील लोकांना जातिभेदाचा सामना करावा लागत आहे. डोम जातीतील लोकांच्या जमिनीवर उच्च जातीतील लोकांनी ताबा मिळवल्याचा आरोप देखील केला जातो. तसेच, जातिभेदामुळेच न्याय मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: भीमा-कोरेगाव प्रकरण : फादर स्टॅन स्वामींच्या कम्प्युटरमध्ये हॅकर्संनी टाकले कथित पुरावे

डोम समाज हा पूर्णपणे अंत्यसंस्काराच्या कामावर निर्भर आहे. एकप्रकारे त्यांचा संपूर्ण दिवस मृतदेहांसोबतच जातो. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना इजा होण्याची देखील शक्यता असते. सामाजिकदृष्ट्या देखील हा समाज पिछाडीवर आहे. अनुसूचित जातीतून येत असतानाही त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही. एवढेच नाही तर त्यांच्या मुलांना देखील शाळेत वेगळे बसवले जाते. शिक्षण न मिळाल्यामुळे सामाजिक स्तर देखील बदललेला नाही.

कमी वयात लग्न

दारू आणि गांजाची नशा करणे हे या लोकांसाठी सामान्य बाब आहे. विशेष म्हणजे या समाजातील केवळ पुरुष मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. तर महिला केवळ घरकाम करतात. या समाजातील लोकांचे लग्न देखील कमी वयात होते. कुटुंब नियोजन असल्या गोष्टी माहीत नसल्याने मुलांची संख्या जास्त असणे हे सामान्य आहे. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने मुलं लहान वयातच अंंत्यसंस्कार करण्यास सुरुवात करतात. थोडक्यात, मृतदेहांवर अंत्यसंस्कार करूनच हे लोकं स्वतःचे पोट भरतात.

वाराणसी शहराला आहे ऐतिहासिक महत्त्व

'वरुणा' आणि 'अस्सी' या दोन नद्यांवरून शहराला वाराणसी असे नाव पडले. हिंदू पौराणिक कथांमध्ये देखील या शहराचा उल्लेख आढळतो. हिंदू पौराणिक कथांनुसार भगवान शिव आणि पार्वती एकदा वाराणसीमध्ये आले होते. देवी पार्वती या मणिकर्णिका घाटावर स्नान करत असताना त्यांच्या एका कानातील कुंडल हरवते. ही वस्तू कालू नावाचा राजा लपवून ठेवतो. मात्र, शोधल्यानंतरही ते न सापडल्याने भगवान शिव अखेर शाप देतात. ज्यांच्याकडे कानातले असतील, त्याचा नाश होईल. असा शाप दिल्याने कालू घाबरून भगवान शिव यांची माफी मागतो. अखेर भगवान शिव हा शाप मागे घेऊन कालूला स्मशानभूमीचा राजा बनवतात. पुढे जाऊन कालूच्या वंशाचे नाव डोम पडले.

हिंदू वर्ण व्यवस्थेत सर्वात खाली

पौराणिक कथा आणि हिंदू वर्ण व्यवस्थेनुसार डोम हे शुद्र समजले जातात. मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम ते अनेक वर्षांपासून करत आहेत. वाराणसीच्या काही जुन्या कथांमध्ये डोम राजाचा देखील उल्लेख आढळतो. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी देखील निवडणुकीदरम्यान त्यांना प्रस्तावक बनवले होते.

टॅग्स :PM Narendra Modi